Best लग्नासाठी मराठी उखाणे | 50+Marathi ukhane

Best लग्नासाठी मराठी उखाणे | 50+Marathi ukhane

नमस्कार मित्रांनो मराठी ऊखाणे या ब्लॉग वर तुमचं स्वागत आहे . याच्या पहिल्या पोस्ट मध्ये आपण पाहिले नवरीसाठी उखाणे,नवरदेवसाठी उखाणे या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत लग्नासाठी मराठी उखाणे.

लग्न म्हटल कि मराठी उखाणे आलेच. महाराष्ट्रीयन लग्न पद्धतीत उखाणे घेण्याची जुनी पद्धत आहे.तर आम्ही आज घेऊन आलो आहोत. लग्नासाठी मराठी उखाणे आता आम्ही करू तुम्हाला तुमच्या लग्नात उखाणे घेण्यासाठी मद्त. खाली दिलेले लग्नासाठी मराठी उखाणे तुम्ही सहज व पटकन लक्षात ठेऊ शकतात. व कोणी तुम्हाला लग्नात विचारल्या वर लगेच बोलू शकतात .

लग्नासाठी मराठी उखाणे :-

मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
…. बरोबर संसार करीन सुखाचा.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 1

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.

गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं

… रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.

घातली मी वरमाला हसले …. राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
…. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 2

दही,साखर, तूप,
….. राव मला आवडतात खूप.

मंद आहे वारा संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो …. आणि माझी जोडी.

शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड,
…. चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.

एका वर्षात असतात महिने बारा,
…. च्या नावात समावलाय आनंद सारा.

….. आणि माझं नातं घट्ट आहे,
जसं फेव्हीकॉल आणि ग्लू.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 3

मँगो जूस बनवण्यासाठी, आंब्याची काढते साल,
_____रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल.

मुलींची आवडती डिश आहे, पाणीपुरी,
पण _______ माझ्यासोबत खाते, फक्त शेवपुरी.

लग्नात घातली गळ्यात, फुलांची माळ,
________च्या कुशीत येईल, पुढच्या वर्षी बाळ.

शिरा बनवायला, रवा आणला जाडा…
___रावांचे नाव घेते, पिऊन तुळशीचा काढा.

हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात…
कोरोनाला हरवायला, ___राव नी मी बसले घरात.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 4

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,

… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती,
… रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती.

मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,
टिंब टिंब रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,

….…च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.

श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी,

..…..च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 5

रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन,

……च्या साथीने आदर्श संसार करीन.

कोरा कागज काळी शाई,

..….ला रोज देवळात जाण्याची घाई.

सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल,

संसार करु सुखाचा, …..तु, मी आणि एक मुल.

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी,

……च्या जीवनात मला आहे गोडी.

मंगळसूत्राच्या दोन वाटी सासर आणि माहेर

……रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 6

उंबराच्या झाडाखाली दत्त ची सावली

…..रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,

….. रावं बिड्या पितात संडासात बसून.

पुढे जाते वासरू, मागून येते गाय

……रावाना आवडते नेहमी दुधावरची साय.

स्टुलावर स्टूल बत्तिस स्तुल …..राव एकदम ब्यूटिफुल.

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात,

….. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.

प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी. 7

निष्कर्ष :-

आपण Ukhane या ब्लॉग मध्ये लग्नासाठी मराठी उखाणे हे वाचल्या बदल धन्यवाद .
आपणास हि पोस्ट आवडल्यास comment करा, share करा . अश्या नवीन नवीन उखाणे पाहण्यासाठी पुन्हा या ब्लॉग ला भेट द्या, धन्यवाद .

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.